-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : पत्नी आणि मुलाचा खून करून पसार झाल्याचा आरोप असलेला आबिद शेखचा मृतदेह सापडला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पत्नी आणि मुलाचा खून करून त्यांचे मृतदेह सासवड आणि कात्रज येथे टाकून पसार झालेल्या आबिद शेख याचा अखेर मृतदेह सापडला. पुणे जिल्ह्यातील खानापूर गावाजवळील एका नदीच्या पात्रात आज सकाळच्या सुमारास हा मृतदेह सापडला. त्यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाला आहे. 

सासवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत आलिया शेख (वय 35) हिचा तर भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नवीन कात्रज बोगद्याजवळ आयान शेख या चिमुरड्याचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना पुणे सातारा रस्त्यावर एक बेवारस कार सापडली होती.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

या कारची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित अभिषेक हा पायी जाताना पोलिसांना दिसून आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. यासाठी पुणे पोलिसांनी सात वेगवेगळी पथके स्थापन केली होती.

दरम्यान आज सकाळी खानापूर गावाजवळील नदीच्या पात्रात एक मृतदेह असल्याची माहिती हवेली पोलिसांना मिळाली होती. हवेली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा मृतदेह आबिद शेख याचा असल्याचे निष्पन्न झाले. ग्रामीण पोलीस आणि त्यानंतर पुणे पोलिसांना याची माहिती दिली. पुणे पोलिसांचे एक पथक सध्या घटनास्थळी रवाना झाला आहे. आबिद शेख यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.