Nanded City : कालव्यात बुडालेल्या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला 

एमपीसी न्यूज – पुण्यातील नांदेड सिटीमागील कालव्यात बुडालेल्या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह आज सायंकाळच्या सुमारास सापडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. 

गिरीश अमरनाथ साहनी (वय ११, रा.दांगट पाटील इस्टेट मूळ गाव गोरखपूर उत्तर प्रदेश), असे या बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

गिरीश अन्य तीन मुलांसह काल येथे आला होता. त्याच्या बुडण्याच्या घटनेने अन्य तिघांनी पळ काढला. या मुलाचा काल अग्निशामक दलाच्या जवानांनी खूप शोध घेतला. मात्र, त्याचा मृतदेह सापडला नाही. आज पुन्हा शोधकार्य सुरू केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास गिरीशचा मृतदेह सापडला. गिरीश सानुपाटील विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.