Saswad : शीर नसलेला महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

एमपीसी न्यूज – एका अनोळखी महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (दि.2) रात्री 10 च्या सुमारास सासवड येथील किर्लोस्कर कंपनीच्या बाजूला असणा-या तार कंपाउंडच्या बाहेरील बाजूस हा मृतदेह आढळून आला.

याप्रकरणी प्रकाश रामचंद्र कदम (वय 56, रा.सासवड) यांनी फिर्याद दिली आहे. या महिलेचे अंदाजे वय 20 ते 25 वर्ष असावे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड येथील किर्लोस्कर कंपनीच्या बाजूला असणा-या तार कंपाउंडच्या बाहेरील बाजूस एका 20 ते 25 वर्ष वयोगटातील एका अनोळखी महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. अज्ञात इसमाने धारदार हत्याराने या अनोळखी स्त्रीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी हा प्रकार केला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी पुढील तपास सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम बी पाटील करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.