Nigdi News: कुटुंबीयांनी नाकारलेल्या कोरोनाबाधित मृतांच्या अस्थी सोनवणे प्रतिष्ठानने विधिवत केल्या विसर्जित

कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर महानगरपालिकेकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यानंतर अस्थीविषयी नातेवाईक भीतीपोटी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळतं आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांवर निगडीच्या अमरधाम स्मशानभूमीत महानगरपालिकेतर्फे अत्यंसंस्कार करण्यात आले होते. मात्र, अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या अस्थी तिथेच ठेवण्यात आल्या होत्या.

दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने नातेवाईक देखील अस्थी घेऊन जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे समाज भान जपत सोनवणे प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 10 व्यक्तींच्या अस्थींचे विधिवत इंद्रायणी नदीत विसर्जन केले.

कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर महानगरपालिकेकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यानंतर अस्थीविषयी नातेवाईक भीतीपोटी दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळतं आहे.

निगडीच्या अमरधाम येथील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर नातेवाईकविना अस्थी स्मशानभूमीत तशाच ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सामाजिक भावनेतून पौर्णिमा सोनवणे प्रतिष्ठानने विधिवत पूजा करून या अस्थी इंद्रायणी नदीत विसर्जित केल्या आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक नातेवाईक त्यांच्या अस्थी घेण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे सामाजिक भान ठेवत आम्ही अस्थी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. विधिवत पूजा करून इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जित केल्या आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनवणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.