Dehuroad : वधूवर सूचक संकेतस्थळावर ओळख करून लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – वधूवर सूचक संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला. पिंपरी व वाकड येथे हा प्रकार घडला.

आदित्य विनोद चौबे (वय 31, रा. रावेत, मूळ रा. श्रीकृष्णनगर, वाठोडा ले आउट, नंदनवन, नागपूर), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने रविवारी (दि. 1) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य व फिर्यादी तरुणी यांची वधूवर सूचक संकेतस्थळावर ओळख झाली. त्यानंतर आरोपी याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. 24 सप्टेंबर 2019 रोजी पिंपरी येथे एका हॉटेलवर आणि 25 डिसेंबर 2019 रोजी वाकड येथील भुमकर चौकातील एका हॉटेलवर तरुणीशी शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीने लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे आरोपी व तरुणीच्या नातेवाईकांची नागपूर येथे बैठक केली.

मात्र आरोपी व त्याच्या घरच्यांनी काहीएक कारण न देता लग्नास नकार दिला. ‘तू माझ्याशी असे का केलेस’, असे फिर्यादी तरुणीने आरोपी याला विचारले. त्यावर ‘मला तुझ्याशी लग्न करायचेच नव्हते’, असे आरोपीने सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांना मानसिक धक्का बसला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.