Chinchwad : बांधकाम व्यावसायिकाला मित्रानेच लावला 22 लाखांचा चुना

एमपीसी न्यूज –  व्यवसाय सुरू करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक मित्राने मित्राला 22 लाख रूपये दिले. पैसे न देता मित्र गायब झाला. हा प्रकार चिंचवड येथे नुकताच उघडकीस आला आहे.

बांधकाम व्यावसायिक विजय सोमनाथ दाते (वय-40, रा. बळवंत कॉलनी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडूरंग भास्कार पाटील (वय-40, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दाते व आरोपी पाटील मित्र होते. आरोपी पाटीलने दाते यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी 2015 पासून वेळोवेळी 22 लाख रूपये घेतले. फिर्यादी यांना पैसे न देताच आरोपी पाटील पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाते यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.