Bopkhel News : बांधकाम व्यावसायिकाला दमदाटी करत दुचाकी फोडली

दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर काम करत असलेल्या व्यक्तीला सात जणांनी मिळून शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच त्यांची दुचाकी फोडून नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 10) सायंकाळी सहा वाजता रामनगर, बोपखेल येथे घडली. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

दिनेशकुमार रामसाहाय सिंग (वय 44, रा. रामनगर, बोपखेल) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राहुल ताराचंद सोदे (वय 24), राजकुमार उर्फ पलटी (वय 30) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यासह राहुल मदन सौदे (वय 21), यश (वय 19, पूर्ण नाव माहिती नाही) आणि त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर, बोपखेल येथे मुकेशकुमार यांचे बांधकाम सुरु आहे. त्या बांधकामावर फिर्यादी दिनेशकुमार काम करत होते. बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आरोपी बांधकाम साईटवर आले. त्यांनी दिनेशकुमार यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर दिनेशकुमार यांची दुचाकी (एम एच 14 / जी एम 3163) फोडून तिचे 20 हजारांचे नुकसान केले. पोलिसांनी राहुल आणि राजकुमार या दोघांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.