PCMC : विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार

एमपीसी न्यूज – बालभारतीकडून पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेला पहिल्या टप्प्यात 1 लाख 3 हजार 721 पुस्तके आली आहेत. यामुळे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार आहेत. ही पुस्तके पाहून शिक्षक देखील सुखावले आहेत. कारण या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे बऱ्यापैकी कमी होणार आहे.

Pimpri : वायसीएम रुग्णालयाच्या कचरा कुंडीत सापडले स्त्री जातीचे अर्भक

बालभारतीने प्रथमच प्रत्येक धड्याच्या शेवटी एक कोरे पान दिले आहे. यामुळे प्रत्येक विषयाला स्वतंत्र वही करण्याची गरज भासणार नाही. तसेच धडा संपताच त्यातील अवघड शब्द, कठीण प्रश्‍नांची उत्तरे तिथेच लिहिली जाणार असल्याने अभ्यास करणे आणखी सोपे होणार आहे.

शासनाकडून समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यंदाही शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी बालभारतीकडे मराठी, इंग्रजी आणि उर्दू पुस्तकांची मागणी केली होती. शहरातील 99 हजार विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने बाल भारतीकडे पुस्तकांची मागणी केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बालभारतीकडून 1 लाख 3 हजार 721 पुस्तके आली आहेत.

शिक्षण विभागाच्या मागणीनुसार बालभारतीकडून महापालिकेच्या पिंपरी (PCMC) आणि आकुर्डीच्या उन्नत केंद्रावर पुस्तके उपलब्ध झाली आहेत. जून महिन्यात 20 केंद्रांवरून ती पुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थी शाळेत आल्यावर त्यांचे स्वागत नवी कोरी पुस्तके देऊन केले जाणार आहे.

यावर्षी पाठ्यपुस्तकांमध्ये बालभारतीने बदल केलेला असून इयत्ता पहिली ते आठवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकाचे चार संच देण्यात येणार आहेत. स्वाध्याय सोडवण्यासाठी, नोंदी करण्यासाठी, कठीण शब्द, थोडक्‍यात उत्तरे लिहिण्यासाठी तसेच प्रत्येक विषयाला स्वतंत्र वही करण्याची आवश्‍यकता येऊ नये, प्रत्येक धड्याच्या शेवटी एक कोरे पान देण्यात आले आहे.

पाठ्यपुस्तकात प्रथमच राज्यगीत
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना आपल्या राज्यगीताबद्दल माहिती व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने यंदा प्रथमच बाल भारतीने पाठ्यपुस्तकात
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा !! या राज्यगीताची छपाई केली आहे.

Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे पुरस्कार प्रदान सोहळा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.