-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari News : घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि पन्नास हजारांची रोकड चोरीला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – संत तुकाराम नगर भोसरी येथे एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि पन्नास हजारांची रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा ऐवज चोरून नेल. ही घटना सोमवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

रोहित जयसिंग ओव्हाळ (वय 26, रा. संत तुकाराम नगर, मानस सरोवर अपार्टमेंट, भोसरी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 15) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओव्हाळ यांचे घर रविवारी (दि. 13) सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्याचे कानातील वेल सुमारे आठ ग्रॅम वजनाचे आणि पन्नास हजारांची रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.