Pimpri: दापोडी-निगडी बीआरटीएस मार्गावर शुक्रवारपासून बस धावणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या  बीआरटीएस मार्गावरील बंदी न्यायालयाने उठविली आहे. प्रायोगिकतत्वावर दोन महिने बीआरटी बस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हा बीआरटीएस मार्ग येत्या शुक्रवार (दि.24) पासून सुरु करण्यात येणार असल्याचे,  आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. दोन महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करुन कायमस्वरुपी बस चालू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच निगडी येथील बस टर्मिनलचे उद्‌घाटन देखील शुक्रवारी करण्यात येणार असल्याचे, त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी ‘बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम’ अर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला होता.

सन 2013 मध्ये बीआरटीएस मार्गावर सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या नसल्याचे कारण देत हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने सुरक्षिततेबाबत उपाययोजना करुन याचिकाकर्त्यांसोबत मार्गावर तीन वेळा बसची चाचणी घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावली झाली. न्यायालयाने बीआरटीएस बस सुरु करण्यास नुकताच हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून या मार्गावर बस धावणार आहे. दोन महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करुन कायमस्वरुपी बस चालू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1