Nashik News : नाशिकहून दिल्लीला जाण्यासाठी राजधानी आता दररोज 

नाशिकच्या व्यवसायाला मिळणार चालना

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : मुंबई – दिल्ली प्रवासासाठी सुलभ असलेली राजधानी एक्स्प्रेस आता रोज धावणार असून त्याचा एक थांबा नाशिकरोड स्थानकावर असणार आहे. त्यामुळे नाशिकच्या व्यवसाय क्षेत्राला चालना मिळणार आहे.  

मुंबईतून नाशिकमार्गे दिल्लीपर्यंत आठवड्यातून दोन दिवस धावणारी राजधानी एक्सप्रेस आता दररोज धावणार असल्याने दिल्लीचा प्रवास आता अधिक सुखकर होण्याबरोबरच उद्योग व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.

 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन स्थानक या दरम्यान राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वेमार्गे सुरू करावी, अशी मागणी वेळोवेळी खासदार हेमंत गोडसे यांनी केली होती त्यानुसार मध्य रेल्वेमार्गे प्रथमच राजधानी धावू लागली. राजधानीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. पूर्वी आठवड्यातून चारच दिवस राजधानी धावत होती. मात्र , राजधानी एक्सप्रेस रोज सुरू करावी याकरिता खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केल्याने अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.

19 जानेवारीपासून राजधानी दररोज धावणार आहे. यामुळे उद्योग व्यवसायाला चालना मिळून नाशिककरांना पंधरा ते सोळा तासांत दिल्लीचा प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.