WTC 2021 : कर्णधार उपकर्णधाराने डाव सावरला, दुसऱ्या दिवस अखेर भारत 3 बाद 146 

एमपीसी न्यूज – भारताला मजबूत सुरुवात करून देणाऱ्या गिल आणि शर्मा जोडी संघाच्या शंभर धावांच्या आत तंबूत परतले. त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजारा देखील लवकर बाद झाला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी त्यानंतर भारतीय संघाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघ तीन बाद 140 धावांपर्यंत मजल मारू शकला. अंधुक प्रकाशामुळे 64.4 षटकांनंतर खेळ होऊ शकला नाही

इंग्लंड मधील साऊथम्पटन मैदानावर भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना सुरू आहे. पावसामुळे पहिला दिवस वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सामना सुरु झाला. न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने 68 चेंडूंत 34 धावा केल्या आणि शुभमन गिल 64 चेंडूंत 28 धावा केल्या. गिल आणि शर्मा जोडीने 62 धावांची आश्वासक सलामी दिली.

 

कायले जॅमीसनने रोहित शर्माला झेलबाद केले. दिला. त्यानंतर नील वॉगनरने शुभमनला खेळपट्टीवर फार काळ टिकू दिले नाही. पुजाराने पहिली धाव घेण्यासाठी 36 चेंडू घेतले. वॉगनरला चौकार खेचून त्याने खाते उघडले. परंतु 54 चेंडूंत फक्त 8 धावा काढणाऱ्या पुजाराला ट्रेंट बोल्टने पायचीत केले.

भारतीय संघाची 3 बाद 88 अशी स्थिती असताना कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या गडय़ासाठी 58 धावांची भर घालून संघाला सावरले. खेळ थांबवण्यात आला, तेव्हा कोहली 44 आणि रहाणे 29 धावांवर खेळत होते. तिसऱ्या दिवशी कर्णधार उपकर्णधाराची जोडी भारतीय संघाला कुठवर घेऊन जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.