Wakad : पार्किंगच्या कारणावरून कार पेटवली

0

एमपीसी न्यूज – ‘तू या ठिकाणी गाडी पार्क का करतो, तुझ्या गाडीची वाटच लावतो’ असे म्हणत कार पेटवली. ही घटना बुधवारी (दि. 18) पहाटे अडीच वाजता गंगा कॉलनी, काळेवाडी येथे घडली.

 

वसंत अप्पा भोसले (वय 58, रा. गंगा कॉलनी, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ज्ञानेश्वर बबन नढे (वय अंदाजे 50, रा. काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर याने फिर्यादी यांना ‘तू या ठिकाणी गाडी पार्क का करतो, तुझ्या गाडीची वाटच लावतो’ असे म्हणून शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांची कार (एम एच 14 / बी एक्स 9172) पहाटेच्या वेळी जाळली. यामध्ये कारच्या कव्हरला आग लागून नुकसान झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III