Lonavala : गिधाड तलावात कार पडली

एमपीसी न्यूज – लोणावळा (Lonavala) परिसरातील गिधाड तलावात एक कार पडली. ही घटना मंगळवारी (दि. 30) सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा येथील आयएनएस शिवाजी व एअर फोर्स स्टेशन जवळ एक नवीन उड्डाणपूल झाला आहे. त्या ठिकाणी गिधाड तलाव आहे. त्या तलावात मंगळवारी सायंकाळी एक कार पडली.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असता कारमध्ये कोणीही आढळले नाही. वेळीच कारमधील व्यक्ती बाहेर पडला असल्याचे समजले आहे. कार तलावातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.