Bhosari : छताचा पत्रा उचकटून कंपनीतून सव्वालाखांचे डाय चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून चोरटयांनी कंपनीतील सव्वालाख रुपये किमतीचे डाय चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी नऊच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली. 

सचिन लोहाडे (वय 40,रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी येथे सरफेस कोटिंग इक्विटमेंट कंपनी आहे. शुक्रवारी (दि. 27) रात्री कंपनी बंद असताना चोरटयांनी छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. चोरटयांनी कंपनीतील कास्टिंग डाय आणि अल्युमिनियम बारची सात पोती असा 1 लाख 28 हजारांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.