Talegaon : गायन आणि निवेदनातून उलगडणार समर्थ रामदास यांचे चरित्र

एमपीसी न्यूज – श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड व योगिराज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत रामदासायन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये संगीतकार, गायक व निवेदक पराग पांडव व संपदा थिटे हे समर्थ रामदासांचे चरित्र सहजतेने उलगडून दाखविणार आहेत.

‘संगीत रामदासायन’ हा कार्यक्रम बुधवार (दि. 15) रोजी तळेगाव दाभाडे येथील योगीराज हॉल येथे सायंकाळी पाच ते सात या वेळेत होणार आहे.

समर्थ रामदास व त्यांचे चरित्र हे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ रामदास यांची आरती करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.