Pune : केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्याची एफआरपी प्रश्नावर केली फसवणूक – खासदार राजू शेट्टी

एमपीसी न्यूज – केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्याची एफआरपी प्रश्नावर फसवणूक केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यासाठी वेळप्रसंगी राज्याची तिजोरी खाली करू अशी घोषणा केली होती. तर या मुख्यमंत्र्याचा आम्ही आता शोध घेत आहोत, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका चौक ते साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा योगेंद्र यादव तसेच राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. तर यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याची एफआरपी मागील कित्येक महिन्यापासून प्रलंबित आहे. अशा साखर कारखानदारवर सरकारने कारवाई करावी. अशी मागणी कित्येक वेळा केली. मात्र, अद्याप पर्यंत सरकारने कोणत्याही प्रकाराचा निर्णय घेतला नाही. यामुळे आज मोर्चा काढला असून या मोर्चाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.