Kalapini : कलापिनी बाल भवनच्या बालकांनी दहीहंडी केली उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – कलापिनी बाल भवनमध्ये (Kalapini) दहीहंडीचा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे अतिशय उत्साहात व जोश पूर्ण शुक्रवारी (दि.19) साजरा झाला. राधा कृष्णाच्या वेषातील चिमुरडी गोंडस मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

या कार्यक्रमाला कलापिनिच्या कार्याध्यक्षा अंजलीताई सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष अशोक बकरे, स्वास्थ्य योगाच्या प्रमुख रश्मीताई पांढरे आदी उपस्थित होते.

मीराताई कोन्नुर यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीची गोष्ट मुलांना सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्वांनी दहीहंडीभोवती फेर धरून दहीहंडीच्या गाण्यावर ताल धरला. यात पालकांचाही उत्साही सहभाग होता. कृष्ण झालेल्या राजवीर ने दहीहंडी फोडली यावेळी सर्वांना दही काल्याचा प्रसाद देण्यात आला.

पालकांनी बालभवनमध्ये (Kalapini) होत असलेल्या भारतीय संस्कृतीचे जतन करणाऱ्या सण आणि उत्सव यांच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी नटराज श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे नियोजन बालभवन प्रशिक्षिका ज्योतीताई ढमाले, वंदना ताई चेरेकर, मनीषा शिंदे, माधवी एरंडे व विशाखा देशमुख यांनी व रामचंद्र रानडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.