Pimpri : शहरभर गोविंदा रे गोपाळाचा जल्लोष

एमपीसी  न्यूज – ढोल-ताशांचा निनाद… संगीताच्या तालावर बेधुंद होऊन थिरकरणारी तरुणाई… लोककला व नृत्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी केलेली गर्दी… दहीहंडीच्या भोवती केलेली आकर्षक सजावट… आणि ‘गोविंदा रे गोपाळा’ अशी घोषणाबाजी करीत येणारी गोविंदा पथके… असे उत्साहाचे वातावरण  सोमवारी  सायंकाळी सातनंतर शहरामध्ये पाहण्यास मिळाले.
गोपाळकाल्यानिमित्त पिंपरी-चिंचवड परिसरात बालगोपाळांचा उत्साह, गोविंदांचा थरार आणि सेलेब्रिटींची हजेरी अनुभवायला मिळाली. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या तालावर नृत्य करून गर्दीने ओसंडून वाहणारे चौक शहरात गुरुवारी ठिकठिकाणी पाहायला मिळाले.

परंपरेप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याबरोबरच थरावर थर रचलेल्या गोविंदाचा थरार पाहण्याची संधी शहरवासीयांना  मिळाली. रावेत येथील गोविंद धाम येथे प्रवचन, कीर्तन, अभिषेक, नाटिका, विशेष दर्शन आरती आदी धार्मिक कार्यक्रम झाले.  शहरात ठिकठिकाणी चित्रपटसृष्टीतील विविध सेलेब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हे कार्यक्रम चालू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.