Pune : राष्ट्रवादीने केलेल्या कामांमुळेच पुणे शहर एक नंबरवर – चेतन तुपे 

एमपीसी न्यूज –  देशातील 111 शहरामध्ये जगण्यायोग्य शहराच्या यादीमध्ये पुणे शहराला पहिला तर नवी मुंबई ला दुसरा क्रमांक मिळाला आहे. ही आनंदाची बाब आहे.या दोन्ही शहरात मागील पंधरा वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती.तिथे अनेक विकास कामे आणि पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहे.त्यामुळे पुणे शहराचा प्रथम क्रमांक आणि नवी मुंबईचा दुसरा क्रमांक आला आहे, असल्याचा दावा पुणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे.

तुपे यांनी या कामाचं श्रेय पवार कुटुंबियांना दिलं. शरद पवार साहेब,आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे मागील पंधरा वर्षात पुणे शहराचा चेहरा मोहरा बद्दलता आला.याचा मला सार्थ अभिमान आहे.या सर्व कामाची पावती म्हणून 111 शहरामध्ये पुण्याचा एक नंबर आला आहे. हे केवळ राष्ट्रवादीमुळे शक्य झाले असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.