_MPC_DIR_MPU_III

Pimpri : शहरातील जैवविविधतेचा महापालिका करणार सर्व्हे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील जैवविविधतेचे महापालिकेमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  त्यानुसार जानेवारी 2019 पर्यंत शहरातील जैवविविधतेसाठी ‘पॉलीसी’  आणि ‘ऍक्‍शन प्लॅन’ तयार केला जाणार आहे. या कामासाठी मुंबईतील टेरेकॉन इकोटेक या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली.  

_MPC_DIR_MPU_IV

जैवविविधता समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नुकतीच बैठक झाली. अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे, समितीच्या सदस्या कमल घोलप, अर्चना बारणे, सुवर्णा बुर्डे, अनुराधा गोरखे, महापालिकेचे  उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, चंद्रकांत कोंडे, दिग्वीजय पवार बैठकीला उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

केंद्र शासनाच्या जैवविविधता व्यवस्थापन नियमानुसार महापालिकेमध्ये जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महापालिका शहरातील जैवविविधतेचे सर्वेक्षण करणार आहे. त्यासाठी मुंबईतील टेरेकॉन इकोटेक या कंपनी सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण संपूर्ण शहर परिसरात जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.  त्याद्वारे शहरातील जैवविविधतेची सद्यस्थिती व त्यासाठी आवश्‍यक उपाय योजनांचा अहवाल तयार केला जाणार आहे.

या अहवालानुसार महापालिकेची जैवविविधता समिती संरक्षण व संवर्धन प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पांना समिती भेटी देऊन त्यातून प्रगती जाणून घेणार आहे. या बैठकीत टेरेकॉन इकोटेकचे प्रतिनिधी अशोक जैन, डॉ. निनाद राऊत, अक्षय नाचणे आणि अक्षय पंदीरकर यांनी आत्तापर्यंत झालेल्या कामाची माहिती दिली. तसेच भविष्यातील प्रस्तावीत कामाचे सादरीकरण केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.