BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : शहरात घड्याळाचे बारा वाजले; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सांगितला जात होता. अजितदादा या शहराचे नेते होते. आता या बालेकिल्यात दोन उमेदवारही मिळू शकले नाहीत, अशी राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. शहरात घड्याळाचे बारा वाजले आहेत. त्यामुळे घड्याळ घ्यायला कोणी तयार नाही. पक्षात कोणी राहत नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर केली. महायुतीचे शहरातील तीनही मतदार संघातील उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी-चिंचवड शहरातून भाजप-शिवसेनेने हद्दपार केले आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही. दुसर्‍याला मांडीवर ठेवून निवडणूक लढवावी लागते, हे दुर्दैव आहे. हे उमेदवार सक्षम नसून त्यांचे डिपॉझिटही राहणार नाही, त्यांना शहरातील जनता स्थान देणार नाही. राजकीय जीवनात उध्वस्त झालेली ही मंडळी आहेत. त्यांना भविष्य राहिले नाही.

लक्ष्मण जगताप म्हणाले, साडेबारा टक्के, अवैध बांधकामे नियमित केले. शहरातील वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी आरक्षणाला मंजुरी दिली. शहरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर दिले. नागपूर पेक्षा पिंपरी-चिंचवडवर त्यांनी प्रेम केले. नागपूरनंतर आपल्या शहरात मेट्रो सुरू होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले शहराध्यक्ष, माजी नगरसेवक वसंत लोंढे, घनश्याम खेडेकर, संजय पठारे, राहूल जवळकर, प्रदीप तापकीर, निलेश नेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like