Chikhli : चिखलीत घंटागाडी सुरु, महापौरांच्या हस्ते उदघाटन 

एमपीसी न्यूज – दस-याच्या शुभमुहूर्तावर प्रभाग क्रमांक 2 चिखली येथे घंटागाडी सुरु करण्यात आली. या घंटागाडीचे उदघाटन महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. 
समाजसेविका सोनम रवी जांभुळकर व जागृती महिला प्रतिष्ठानच्यावचीने प्रभागात कच-याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही घंटागाडी सुरु केली. यावेळी स्विकृत सदस्य दिनेश यादव, नगरसेविका सारीका बो-हाडे, नितीन बो-हाडे आदी उपस्थित होते. सोनम रवी जांभुळकर यांच्या या समाजकार्यातून महिलांना मोठे सहकार्य मिळत आहे. महिला प्रतिष्ठानच्या माध्यमांतून असेच समाजपयोगी उपक्रम राबवित असून महिलांमधून त्यांचे कौतुक होत आहे. घंटागाडी सुरुवातीला होती पण वेळेवर येत नव्हती. त्यासाठी महापौर राहूल जाधव व सोनम रवी जांभुळकर  यांच्या पाठपुराव्याने ही घंटागाडी सुरु झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.