Pune : सीएनजी दरवाढीच्या फटक्याने पीएमपीचा गाडा खोलात 

एमपीसी न्यूज – इंधनाच्या किंमतीत सातत्याने होणा-या वाढीमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या पीएमपीला आता ‘सीएनजी’ दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. गुरूवारी मध्यरात्रीपासून पीएमपीला पुरवठा करण्यात येणा-या ‘सीएनजी’चा दर 3 रुपये प्रतिकिलोने वाढणार आहे. यामुळे सीएनजी आता 55 रुपये किलो झाले असून दररोज तब्बल 1 लाख 86 हजार रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे. पीएमपीला इंधनदरवाढीचा मोठा फटका बसत आहे.

मे ते ऑगस्ट या चार महिन्यांत पीएमपीला मिळणाच्या डिझेल दरांत 4 रुपये 15 पैसे, तर एकट्या ऑगस्टमध्ये तब्बल 6 रुपये 25 पैसे वाढ झाली आहे. यामुळे तोट्यातील पीएमपीचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. यातच ‘सीएनजी दर गुरूवारपासून 3 रुपयांनी वाढ झाल्याचे पत्र महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पीएमपीला दिले आहे.

आजवर 52 रुपये किलोने पीएमपीला रोज 32 लाख 24 हजार यावर खर्च करावे लागत होते. मात्र, आता ही किंमत 34 लाख 10 हजार रुपये झाली आहे. यामुळे पीएमपी गॅस’वर आली असून लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.