Weather news today : पुण्यात थंडीचा अंमल पुन्हा वाढू लागला

पुण्यात शुक्रवारी किमान तापमान  ११.७ अंश सेल्सिअस

एमपीसी न्यूज : गेले काही दिवस राज्यात सकाळी धुके, दुपारी उकाडा आणि रात्री गारवा असे तीन वेगवेगळे वातावरण जाणवत होते. आता हळूहळू थंडीचा अंमल वाढू लागला आहे  पुण्यात शुक्रवारी किमान तापमान  ११.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले बुरेवी चक्रीवादळ आत श्रीलंकेच्या किनारपट्टीला धडकून तामिळनाडूच्या दिशेने सरकत आहे. सध्या या चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने त्याचा प्रभाव कमी होऊ लागला आहे.   

हे वादळ चक्त्र ते मन्नारच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. सध्या तामिळनाडू, केरळमध्ये जाेरदार पाऊस पडत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ५ डिसेंबरपर्यंत जाणवणार आहे. त्यानंतर वाऱ्यांची दिशा बदलल्यावर उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढून राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला. त्याचा परिणाम राज्यातील ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. बुरेवी चक्रीवादळाचा परिणाम आणखी ४ दिवस जाणवेल. त्यानंतर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर कमी झाल्यावर उत्तरेकडील थंड वारे राज्यात वाहण्यास सुरुवात होईल. त्यानंतर आपल्याकडे किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होऊ शकेल.

मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर कोकण, गोवा व विदर्भातील काही ठिकाणच्या किमान तापमानात किंचित घट झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.