Weather News Today : राज्यात पुण्यात सर्वाधिक थंडी

महाबळेश्वरला टाकले मागे

एमपीसी : राज्यात सर्वाधिक थंडी पडणाऱ्या महाबळेश्वरला पुण्याने रविवारी (दि.6) मागे टाकले. काल रात्री पुण्याचे सर्वात कमी किमान तापमान 10.4 डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्याखालोखाल नाशिकचे किमान तापमान 10.6 डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले. तर महाबळेश्वरचे किमान तापमान 13.9 डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले. सरासरीपेक्षा किमान तापमानात – 2 (दोन सेल्सिअसने) कमी नोंदविले गेल्यामुळे पुणे शहरात पहाटेपर्यंत गुलाबी थंडी जाणवली.

पुणे वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा -2 सेल्सिअस ने घटले. त्यामुळे बहुतांश भागात गुलाबी थंडी जाणवली.

राज्यातील प्रमुख शहरात नोंदवले गेलेले किमान तापमान खालीलप्रमाणे : मुंबई (कुलाबा) 22.4, सांताक्रुझ 18.4, अलिबाग-रत्नागिरी 20.2, पणजी 19.9, डहाणू 18.8, जळगाव 13, कोल्हापूर 16.9, महाबळेश्वर 13.9, मालेगाव 13, नाशिक 10.6, सांगली 14.4, सांगली 14.4, सातारा 13, सोलापूर 13.5, औरंगाबाद 12.2, परभणी 10.8, नांदेड 13.5, अकोला 12.7, अमरावती 14.7, बुलढाणा  14.2, ब्रह्मपुरी 13.6,  चंद्रपूर 18.2, गोंदिया 12.8, नागपूर 12.9, वाशिम 12.8, वर्धा 12.8 डिग्री.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.