Pimpri : विसर्जित केलेल्या दीड हजार मूर्तींचे संकलन

कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशनचा उपक्रम

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जनावेळी विसर्जित केलेल्या नदीपात्रातील गाळात फसलेल्या तब्बल 1 हजार 500 गणेश मूर्ती कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलीस व नागरिक मित्र संघटनेच्या वतीने बाहेर काढण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश विसर्जन घटनांवर फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. गणेश उत्सवादरम्यान पोलीस आणि प्रशासनाला विविध उपक्रमांमधून सहकार्य केल्यानंतर विसर्जन केल्यानंतर देखील सामाजिक जबाबदारीची जाणीव यानिमित्ताने फाउंडेशनने ठेवल्याचे दिसत आहे.

_MPC_DIR_MPU_II

चिंचवड, निगडी, पिंपरी, संभाजीनगर, मोशी आदी घाटांवर संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल पालकर, प्रकाश मिर्जापूरे, अशोक तनपुरे, विठ्ठल सहाणे, अरुण पाटील, अनिता धोका, कल्पना भाईगडे, किरण हतनकर, दत्तात्रय खांबे, नकुल तळेले, वासुदेव काळशेकर, सूर्यकांत बारसावडे, चंद्रकांत पवार, दत्त अवसरकर, सुदाम गुरव, सुधीर जमदाडे, रमेश मालुसरे, लक्ष्मण शिंदे, विजय आबड, किशोरी हरणे, प्रवीण कांबळे, अरुण पाटील, देवजी सापरिया, ज्योती साखरे, मीरा निकटे, अनिता सानदेव आदी उपस्थित होते. महापालिका अतिरिक्त आयुक्त किरण गावडे आणि अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी उपक्रम स्थळांवर भेट देऊन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.

संघटनेच्या माध्यमातून गणेशोत्सवादरम्यान पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्यात आले. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियोजन करण्यास वाहतूक विभागाला मदत केली. विविध विसर्जन घाटांवर शेकडो किलो निर्माल्य जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पडलेला प्लास्टिक कचरा जमा करून त्याची देखील योग्य विल्हेवाट लावण्यात आली. बहुतांश नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला नदीमध्ये विसर्जित करतात. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मूर्ती जमा होतात. या जमा झालेल्या मूर्तींमुळे नदी प्रदूषण होते. नदीपात्रात पाणी कमी असल्यास गणेश मूर्ती उघड्या पडतात. त्यामुळे त्यांना बाहेर काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असते. फाउंडेशनच्या वतीने दीड हजार मूर्ती नदीपात्रातून बाहेर काढण्यात आल्या. फाउंडेशन मागील अठरा वर्षांपासून सामाजिक शांतता, वाहतूक, पर्यावरण, शैक्षणिक, क्रीडा आणि रुग्णमित्र आदी क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.