Chakan : कंपनीचे बँक अकाउंट हॅक करून 40 लाख लंपास

एमपीसी न्यूज – चाकण येथील एका कंपनीचे बँक अकाउंट हॅक करून कंपनीच्या बँक खात्यावरील तब्बल 40 लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार शुक्रवारी (दि. 19) रात्री दहा ते शनिवारी (दि. 20) दुपारी एकच्या दरम्यान घडला.

किशोर दौलत केसवानी (वय 40, रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे शोर ऑटो रबर एक्स्पोर्ट प्रा.ली.ही नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये विविध प्रकारचे रबराचे उत्पादन तयार केले जाते. शुक्रवारी रात्री दहा ते शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी कंपनीचे बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर हॅक करून दोन खात्यांची संपूर्ण माहिती मिळवली व त्याआधारे त्यांनी बँकेच्या खात्यावरून तब्बल 40 लाख रुपये काढून घेतले. ही बाब किशोर यांच्या शनिवारी उशिरा लक्षात आली. यावरून त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात आरोपींवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.