Bhosari : कंपनीच्या दुकानाचे शटर उचकटून पावणेचार लाखांच्या वायर चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या दुकानाचे पत्र्याचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 79 हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वायर चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी ग्लोबल ट्रेडिंग कंपनी, भोसरी एमआयडीसी येथे उघडकीस आली.

नितीन बालाभाय कामलीया (वय 26, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीमध्ये ग्लोबल ट्रेडिंग कंपनीचे दुकान आहे. फिर्यादी यांनी शनिवारी रात्री साडेसात वाजता दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी पत्र्याचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून तीन लाख 79 हजार 511 रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायर चोरून नेली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.