Pune : काँग्रेस खाली खालीच चालली आहे, कोणत्याही कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी उठायला तयारच नाही

असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – काँगेस ही खाली खालीच चालली आहे. कोणत्याही कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी उठायला तयार नाही, आशा शब्दांत बॅरिस्टर खासदार तथा एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज काँगेसवर हल्लाबोल केला. तसेच, जहाज बुडत असताना, कॅप्टनने लोकांना बाहेर काढणे गरजेचे असते. मात्र, कॅप्टनच डुबती नय्या सोडून गेला, त्याच्याकडून काय अपेक्षा करायची? असा सवाल राहुल गांधी यांचे नाव न घेता उपस्थित केला. पुण्यात विधानसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवारांचा प्रचारार्थ त्यांची सभा आयोजित केली होती. 

_MPC_DIR_MPU_II

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार फॅसिस्ट (विशिष्ट धर्माकडे) वाटचाल करीत आहे. आमचा त्याला विरोध आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा सविंधानावर देश चालावा. आरएसएस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांची गुलामी सोडून सत्ताधारी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. सध्या मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात आहे. एकत्र जमाव होऊन हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांना विद्यमान सारकरचीही साथ आहे. त्यामुळे त्यांची हिम्मत वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमिरिकेत जाऊन व्हेरी गूड म्हणतात, व्हॉट इज गूड, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुण्यात माझी चौथी किंवा पाचवी सभा आहे. यावेळी मात्र, पोलिसांनी मला लव लेटर दिले नाही. आयलवयू आपले संबंध प्रेमाचे आहे, ते असेच राहावे अशी आठवणही ओवेसी यांनी करून दिली.

मुस्लिम समाजाला आरक्षण का नाही?
मराठा समजाकडे सर्व आहे, तरीही त्यांना आरक्षण देण्यात आले. आमच्याकडे काही नसताना मुस्लिम समाजाला आरक्षण का मिळत नाही? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.