Bhosari : कामगाराच्या पगारावरून ठेकेदाराची मारहाण

एमपीसी न्यूज – दिवाळीपूर्वी कामगारांचे पगार करण्यावरून ठेकेदाराने वर्कशॉपमध्ये घुसून मारहाण केली. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे बुधवारी ( ता. 31) रात्री घडली.

भागवत विक्रम जवरे(वय 44, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप शेठ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भागवत यांचे एमआयडीसी भोसरी येथे ओम बीटेक इंजिनिअरिंग नावाचे वर्कशॉप आहे. आरोपी संदीप शेठ यांचा त्या ठिकाणी कामगार पुरविण्याचा ठेका आहे. बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयात असताना आरोपी संदीप तिथे आला. दिवाळीपूर्वी कामगारांचे पगार द्यावे या कारणावरून भागवत आणि संदीप या दोघांमध्ये वादविवाद झाला. त्यावेळी संदीप शेठ याने शिवीगाळ करीत भागवत यांना लोखंडी रॉडनी मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक उपनिरीक्षक केदारी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.