Hinjawadi News : बंद हॉटेलमधून स्वयंपाकाची भट्टी चोरीला

The cooking furnace was stolen from the closed hotel.

एमपीसी न्यूज – बंद असलेल्या हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी साउथ इंडियन पद्धतीची स्वयंपाकाची भट्टी आणि काउंटर चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री अकरा वाजता कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड येथे हॉटेल हॅप्पी ट्रीट येथे उघडकीस आली.

संगीता अशोक शिंदे (वय 45, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड येथे इंदिरा कॉलेज जवळ फीर्यादी यांचे हॅप्पी ट्रीट नावाचे हॉटेल आहे. 5 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या कालावधीत त्यांचे हॉटेल बंद होते.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. हॉटेलमधून एक स्टीलचे काउंटर आणि एक साउथ इंडिअन पद्धतीची स्वयंपाकाची भट्टी असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.