World Update: जगात कोरोनाबाधित मृतांचा आकडा अडीच लाखांच्या पुढे, मात्र मृत्यूदरात घट

जगात 36.44 लाख जणांना कोरोनाचा संसर्ग, 11.94 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात, 33 टक्के रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 36 लाख 44 हजार 840 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 52 हजार 366 (6.9 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 11 लाख 94 हजार 872 (32.8 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 21 लाख 97 हजार 602 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 21 लाख 47 हजार 967 म्हणजेच तब्बल 98 टक्के रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 49 हजार 635 म्हणजेच केवळ 2 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच  मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट दिसत आहे त्याच बरोबर कोरोनामुक्तांचा टक्का देखील वाढलेला आहे, ही बाब दिलासादायक आहे.

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

30 एप्रिल – नवे रुग्ण 86 हजार 037  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 801

1 मे – नवे रुग्ण 94 हजार 552  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 624

2 मे – नवे रुग्ण 83 हजार 255  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 215

3 मे – नवे रुग्ण 81 हजार 725  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 480

4 मे – नवे रुग्ण 83 हजार 255  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 096

अमेरिकेत काल (सोमवारी) एका दिवसांत 1,324 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना मृतांचा आकडा 69,921 झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 1,212,835 वर पोहचला आहे. ब्राझीलमध्ये काल 318 तर फ्रान्समध्ये 306 कोरोनोबाधित मृत्यू नोंदविले गेले. ब्रिटनमध्ये काल दिवसभरात 288, इटलीत 195, कॅनडामध्ये 172 तर स्पेनमध्ये कोरोनाचे 164 बळी गेले आहेत. फ्रान्सने कोरोना मृतांचा 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांच्या तर बेल्जियममध्ये 50 हजारांच्या पुढे गेला आहे.

रशिया सातव्या तर भारत 15 व्या स्थानावर

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत काल रशिया, भारत आणि इक्वाडोर या तीन देशांना वरचे स्थान प्राप्त झाले आहे. रशिया आठव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहचला, भारत 16 व्या स्थानावरून 15 व्या स्थानावर गेला आहे तर इक्वाडोर 18 व्या स्थानावरून 17 व्या स्थानावर गेला आहे.  टर्की सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर गेला आहे. नेदरलँड 16 व्या तर स्वत्झर्लंड 18 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 12,12,835 (+24,713), मृत 69,921 (+1,324)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,48,301 (+1,179), मृत 25,428 (+164)
  3. इटली – कोरोनाबाधित 2,11,938 (+1,221), मृत 29,079 (+195)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 1,90,584 (+3,985), मृत 28,734 (+288)
  5. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,69,462 (+769), मृत 25,201 (+306)
  6. जर्मनी – कोरोनाबाधित 1,66,152 (+488), मृत 6,993 (+127)
  7. रशिया – कोरोनाबाधित 1,45,268 (+10,581), मृत 1,356 (+76)
  8. टर्की – कोरोनाबाधित 1,27,659 (+1,614), मृत 3,461 (+64)
  9. ब्राझील – कोरोनाबाधित 1,08,266 (+7,119), मृत 7,343 (+318)
  10. इराण – कोरोनाबाधित 98,647 (+1,223), मृत 6,277 (+74)
  11. चीन – कोरोनाबाधित 82,880 (+3), मृत 4,633 (+0)
  12. कॅनडा –  कोरोनाबाधित 60,772 (+1,298), मृत 3,854 (+172)
  13. बेल्जियम – कोरोनाबाधित 50,267 (+361), मृत 7,924 (+80)
  14. पेरू –  कोरोनाबाधित 47,372 (+1,444) , मृत 1,344 (+58) 
  15. भारत – कोरोनाबाधित 46,437 (+3,932) , मृत 1,566 (+175)
  16. नेदरलँड – कोरोनाबाधित 40,770 (+199), मृत 5,082 (+26)
  17. इक्वाडोर – कोरोनाबाधित 31,881 (+2,343), मृत 1,569 (+5)
  18. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 29,981 (+76), मृत 1,784 (+22)
  19. सौदी अरेबियाकोरोनाबाधित 28,656 (+1,645) , मृत 191 (+7) 
  20. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 25,524 (+242), मृत 1,063 (+20)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.