Pune: दोन महिने सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या 98 नगरसेवकांचे पद धोक्यात ?

The corporator who has been absent from the general meeting for two months is in danger situation in pmc

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला 2 महिने गैरहजर राहणाऱ्या 98 नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे. आपले पद वाचविण्यासाठी या नगरसेवकांना जून महिन्यात होणाऱ्या सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे.

पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठ फिरविली आहे. या संकट काळात आपल्या प्रभागातच राहण्यात नगरसेवक प्राधान्य देत आहे.

त्यामुळे कार्यकर्त्यांचीही वर्दळ कमी झाली आहे. कोरोनामुळे महापालिकेचे 3 महिने कामकाज झाले नाही. या महिन्यात ‘फिजिकल डिस्टनसिंग’च्या नियमाचे पालन करून सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापौर आणि आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात सभा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे.

त्याचा फटका महापालिकेला मोठ्याप्रमाणात बसला आहे. उत्पन्नावर परिणाम होण्याबरोबरच शहरातील महत्त्वाची विकासकमेही थांबली आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांची महापालिकेची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे झाली नाही.

लगेचच या दोन्ही महिन्यातील सभा तहकूब करण्यात आल्या. बीपीएमसी ऍक्ट 11 मुख्य सभेला सलग 3 महिने गैरहजर राहिल्यास नगरसेवकांचे पद आपोआप रद्द होते.

एप्रिल, मे आणि जून महिन्यांत सलग 3 महिने अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. त्यामुळे या महिन्यातील सर्वसाधारण सभेला या 98 नगरसेवकांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.