Chinchwad : दरवाजा उघडा ठेवणे पडले महाग, तीन मोबाईल लंपास

एमपीसी न्यूज – घराचा दरवाजा उघडा ठेवणे तरूणाला चांगलेच महाग पडले असून चोरट्याने घरात घुसून 50 हजारांचे तीन मोबाईल लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी नऊच्या दरम्यान वाल्हेकरवाडी येथे घडली.

सुनील तिरूपती पवार (वय 28, रा. वाल्हेकरवाडी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुनील यांनी शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवला होता. अर्धवट दरवाज्यातून चोरटा आत घुसला. सुनील यांचे दोन व त्यांचा मित्र चेतन याचा एक असे 50 हजारांचे तीन मोबाईल चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.