India Corona Update : देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 1.19 तर, आठवड्याचा 1.31 टक्के 

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणावर मंदावला आहे. 24 तासांत 15 हजार 786 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 1.19 तर, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.31 टक्के एवढा आहे. मागील 53 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट तीन टक्क्यांच्या खाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 41 लाख 27 हजार 450 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 34 लाख 95 हजार 808 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.17 टक्के एवढा झाला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून, सध्या 1 लाख 75 हजार 745 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 231 रुग्ण दगावले असून, आजवर 4 लाख 52 हजार 811 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 59 कोटी 70 लाख 66 हजार 481 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 13 लाख 24 हजार 263 नमूने तपासण्यात आले आहेत.

कोरोना विरुद्ध लढाईत भारताने आणखी एक मोठा टप्पा पार केला आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत शंभर कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून, कोरोना विरुद्ध लढाईला देशाला आणखी बळ मिळाले आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत देशात 100 कोटी 59 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.