India Corona Update : देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट दोन टक्क्यांपेक्षा कमी 

एमपीसी न्यूज – भारतात चाळीस हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला असून, तो 1.99 टक्के एवढा झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 38 हजार 949 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 10 लाख 26 हजार 829 एवढी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 कोटी 01 लाख 83 हजार 876 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 40 हजार 026 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात सध्या 4 लाख 30 हजार 422 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 12 हजार 531 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 542 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे. तर, रिकव्हरी रेट 97.28 टक्के एवढा झाला आहे.

देशात 44 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या नाहीत. आजवर 44 कोटी 23 हजार 239 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 19 लाख 55 हजार 910 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 39 कोटी 53 लाख 43 हजार 767 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 38 लाख 78 हजार 078 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.