India Corona Update : देशाचा रिकव्हरी रेट 98.69 टक्के

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 4 हजार 575 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 7 हजार 416 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.69 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 4 कोटी 29 लाख 75 हजार 883 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 24 लाख 13 हजार 566 रूग्ण बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला 46,962 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासांत 154 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 15 हजार 355 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 77.52 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 8.97 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 179 कोटी 33 लाख 99 हजार 555 जणांना लस टोचण्यात आली आहे. चोवीस तासांत 18.69 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.