Pune News : ट्रक-कारच्या भीषण अपघातात खडकीतील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील इंदापूर अकलूज रस्त्यावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात पुण्याच्या खडकी येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. पांडुरंग सिताराम ताथवडे (वय 58 वर्षे) व रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५० वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कारचे पत्रे तोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढावे लागले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, इंदापूर अकलूज रस्त्यावरील विठ्ठलवाडी जवकच्या एका वळणावर ट्रक आणि कार यामध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील ताथवडे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला. इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.