Chinchwad : कौटुंबिक कारणातून चुलत भावाने गळा दाबून केला बहिणीचा खून 

एमपीसी न्यूज – कौटुंबिक कारणातून चुलत भावाने गळा दाबून बहिणीचा खून केला. ही घटना आज (शनिवारी) चिंचवड, दळवीनगर येथे सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

ऋतुजा भोंडवे (रा. दळवीनगर, चिंचवड), असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. संतोष रोहिदास भोंडवे ( वय 25, रा. रावेत) असे आरोपीचे नाव आहे.
ऋतुजा आणि संतोष नात्याने चुलत बहीण-भाऊ होते. त्यांच्यात ‌कौटुंबिक कारणातून वाद सुरू होता. या वादातून संतोष हा आज ऋतुजा हिच्या घरी आला. त्याने ऋतुजा हिचा गळा दाबून खून केला, अशी माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी दिली.  पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.