Pimpri News: शहरातील अतिक्रमणांवरील धडक कारवाई सुरुच राहणार – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri News) सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवरील कारवाई कायम सुरु राहणार आहे. यापुढेही अतिक्रमणावरील धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून शहरातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर जोरदार कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत एक हजार कारवाया करण्यात आल्या आहेत. 14 लाख 69 हजार चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड भुईसपाट झाली आहेत. अतिक्रमणांवरील कारवाई सुरुच राहणार असल्याचे सांगत आयुक्त राजेश पाटील म्हणाले, मोहल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर शहरात जिजाऊ क्‍लिनिक लवकरात-लवकर सुरू केले जाणार आहे.

Alandi Crime News : बांधकाम कामगार दाम्पत्यास मारहाण, एकावर गुन्हा दाखल

पाण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी (Pimpri News) भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून 268 एमएलडी पाणी कसे आणता येईल, यावर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक मिळकत धारकांकडे पाणी मीटर असावेत, पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहरात नव्याने सुरू केलेल्या चार रूग्णालयांमुळे रूग्णांची चांगली सोय झाली आहे. वैद्यकीय विभागासाठी आणखी काही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही आयुक्त पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.