Talegaon : पत्नीला जातीवाचक शिवीगाळ केल्याने पतीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – प्रेमविवाह झाल्यानंतर पतीने पत्नीला जातीवाचक शिवीगाळ केली. यावरून पत्नीने पतीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. ही घटना मागील पाच वर्षांपासून ते 22 सप्टेंबर 2018 या कालावधीत घडली. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 22) तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार प्रकाश नरसू  ढगे याच्याविरोधात छळ, मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि फिर्यादी महिला यांचा प्रेमविवाह झाला आहे. विवाहानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण होत होते. मागील पाच वर्षांपासून भांडण करत प्रकाश याने महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच तिला वेळोवेळी जातीवाचक शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून महिलेने पतीविरोधातच अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.