Pimpri : 25 लाखांचा विक्रीकर बुडविणा-या व्यापा-याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – विक्रीकर बुडविणा-या व्यापा-याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापा-याने 24 लाख 81 हजार 301 रुपयांचा कर बुडविला आहे. हा प्रकार 1 एप्रिल 2012 ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत पिंपरी येथे घडला आहे.

सहाय्यक राज्यकर आयुक्त प्रकाश कुलकर्णी (वय 41, रा. इंदूप्राईड शारदा कॉलनी, पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर (वय 45, रा. प्लॉट नं. 204, अ विंग, वाघेरे पार्क, कीर्ती हॉस्पिटलजवळ, पिंपरी) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनकर हे पिंपरीमध्ये व्यवसाय करतात. 1 एप्रिल 2012 पासून 4 ऑगस्ट 2018 पर्यंत त्यांनी आपल्या व्यवसायाचा कोणत्याही प्रकारचा कर शासनाकडे जमा केला नाही. त्यांच्या व्यवसायाचा विक्रीकर वरील कालावधीत 24 लाख 81 हजार 301 रुपये होत आहे, तो बुडविण्याच्या उद्देशाने त्याने कराची रक्कम शासकीय तिजोरीत भरली नाही. यावरून सोनकर याच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्ह्यासह सह महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा कलम 2002 अन्वये कलम 48(5), 74(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.