Wakad : जमिनीच्या वादातून माजी नगरसेवकाच्या मुलावर ऍट्रासिटीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडे यांचा मुलगा शंतनू नांदगुडे आणि त्याच्या तीन साथीदारांवर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना वाकड येथे घडली. 

याप्रकरणी वाकड येथील 29 वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शंतनू ऊर्फ नाना विलास नांदगुडे (रा. पिंपळे निलख) व त्याचे तीन साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि शंतनू नांदगुडे यांचा जमिनीवरून वाद सुरू आहे. याच वादातून 4 ऑक्‍टोबर रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून मुंबई बंगलोर महामार्गावरील वाकड येथील भुयारी मार्गाजवळ फिर्यादी यांना गाठले. त्यावेळी आरोपींपैकी काहींच्या हातात लोखंडी रॉड होते. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यावेळी तिथे असलेल्या फिर्यादी यांची आई, बहीण, आत्या या फिर्यादी यांना वाचविण्यासाठी आल्या असता त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ केली. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. एम. केंगार तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.