Wakad : घड्याळाचा सेल बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज- घड्याळाचा सेल बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकाला आणि त्याच्या मित्राला दुकानदाराने त्याच्या साथीदारांसोबत मिळून बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दिनांक 30 रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास माऊली चौक वाकड येथे घडली.

Thergaon: डंपरच्या धडकेत डॉक्टर तरुणाचा मृत्यू

अभिषेक अविनाश पारखी (वय 24, रा. सुखकर्ता कॉलनी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड (Wakad) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घड्याळ दुकानदार वर्मा (पूर्ण नाव माहिती नाही), ऋतिक ढसाळ (वय 30), पाटील (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी घेतलेले घड्याळ वॉरंटीत असल्याने त्याचा सेल बदलून घेण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा मित्र निखिल पांचाळ हे आरोपी वर्मा याच्या दुकानात गेले. तिथे वर्मा याने सेल बदलून देण्यास टाळाटाळ करून शिवीगाळ केली. आरोपी ऋतिक ढसाळ याने फिर्यादी यांना कानाखाली मारली. तसेच पाटील याने फिर्यादीस बांबूने मारहाण केली.

या भांडणात फिर्यादींचा मोबाईल फोन खाली पडला. त्यावर आरोपींनी सिमेंट ब्लॉक मारून त्याचे नुकसान केले. आरोपींनी फिर्यादी यांचा मित्र निखिल पांचाळ यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्यालाही जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.