Chakan : गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या गॅस टँकरने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी दहाच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर बहुल गावाजवळ घडली.

रमेश भिकाजी पागिरे (वय 30, रा. वांबोरी, ता. राहुरी, अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ग्यासउद्दीन अमानतअली मनसूरी (वय 45, रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी रमेश त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 बीएस 2528) चाकण शिक्रापूर रोडवरून जात होते. भरधाव वेगात आलेल्या गॅस टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये रमेश गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता ग्यासउद्दीन पळून गेला. याबाबत चाकण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.