Pune : झाडाची फांदी डोक्यात पडल्याने महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – झाडाची फांदी डोक्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (बुधवार) दुपारी आपटे रोड येथे घडली. 

जयश्री जगताप (वय 38), असे या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री या दुपारच्या सुमारास आपटे रस्त्यावरील एका झाडाखाली थांबल्या होत्या. यावेळी झाडाची एक फांदी तुटली. ही फांदी त्यांच्या डोक्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.