Hinjawadi : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वळण घेताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून तरुण गंभीर झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (मंगळवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास हिंजवडीमधील पावर हाऊसजवळ झाला.

अमन पांडे (वय 20, मूळ रा. मध्यप्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन हिंजवडी जवळील इंदिरा महाविद्यालयात बीबीएच्या दुस-या वर्षात शिकत आहे. तो आज सकाळी त्याच्या नातेवाईक महिलेला केटीएम दुचाकीवरून (एमएच 12 / सीएम 2633) हिंजवडी येथील टीसीएस कंपनीत सोडण्यासाठी आला होता. महिलेला कंपनीत सोडून तो परत महाविद्यालयाकडे जात होता.

हिंजवडीमधील पावर हाऊसजवळच्या वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो खाली पडला. दुचाकीचा वेग जास्त असल्याने तो घसरत गेला. तसेच त्याच्या डोक्याला हेल्मेट नसल्याने गंभीर इजा झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, तो रस्त्यावर पडल्याने एका कारला धडकला. याचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.