BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकलीचा मृत्यू

223
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर खेळत असताना पाण्याच्या टाकीत बुडून एका तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 3) सायंकाळी सातच्या सुमारास दिघी परिसरात घडली.

रितू यादव (वय 3) असे पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी ठेकेदार मोहन किसन पवार (26, रा. गणेशनगर, बोपखेल ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघीतील गणेशनगर येथे श्री समर्थ रेसिडेन्सी या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी साईटवर पाण्याच्या टाक्या बनवण्यात आल्या आहेत. शनिवारी सायंकाळी बांधकाम मजूर विनोद यादव यांची मुलगी रितू खेळत असताना पाण्यात टाकीत पडली. यामध्ये तिचा बुडून मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षेबाबत हलगर्जी केल्या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.