Lonavala : ड्युक्स नोजच्या दरीत पडून पर्यटकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लोणावळ्याजवळील कुरवंडे गावाच्या गावाच्या नोज या सुळक्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटक‍ांपैकी एकाचा पाय घसरल्याने तो खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

रोहन महाजन (वय ३२, रा. पडघा, माटूंगा, रेल्वे सिनियर सेक्शन इंजिनिअर माटूंगा) असे या दरीत पडलेल्या पर्यटकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेची काही अधिकारी कर्मचारी लोणावळा परिसरात फिरायला आले होते. कुरवंडे गावातील सह्याद्रीचा उंच सुळका असलेल्या नागफणी याठिकाणी जाऊन पुन्हा खाली येत असताना रोहन याचा पास घसरल्याने तो दरीत सुमारे साडेतीनशे ते चारशे फुट खोल पडला. यामध्ये गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस पथक व शिवदुर्ग मित्र हे रेस्कू पथक घटनास्थळी पोहचत त्यांनी दरीत शोध मोहिम राबवली. साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळून आला असून शिवदुर्ग पथक त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.